jitendra awhad sakal media
महाराष्ट्र बातम्या

'राष्ट्रपती राजवट लावा', भाजप नेते दिल्लीत पोहोचण्याआधीच आव्हाडांचं ट्वीट

राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसा पठण करण्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींदरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपा नेते सातत्याने करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसा पठण हा विषय गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे. याच संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

"राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल", असं ट्वीट राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून राणा दाम्पत्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या विषयामुळे खळबळ सुरू आहे. याची परिणती राणांच्या अटकेत झाली. भाजपच्या काही नेत्यांवर हल्ले देखील झाले. यानंतर भाजपचं शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला रवाना होणार आहे. त्याआधीच आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.

राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर केलेलं आंदोलन, त्यानंतर राणा यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत आपला निर्णय मागे घेणं, भाजपा नेते मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला आणि राणा दाम्पत्याची अटक या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा नेत्यांकडून सातत्याने होत आहे. त्या संदर्भाने जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT