Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

Global Tariff Policy : सक्तीच्या मजुरीचा वापर केल्याचा आरोप करत अमेरिका हे शुल्क लागू करत आहे. भारतासह 17 देशांना कमी (१०%) शुल्क श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. मेक्सिको आणि कॅनडाला USMCA करारामुळे या टॅरिफमधून सूट देण्यात आली आहे.
Donald Trump 

Donald Trump 

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि इतर देशांना मध्यरात्री मोठा झटका दिला आहे. ट्रम्प यांनी १०% ते १२.५% टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. भारताचा समावेश १०% शुल्क श्रेणीमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी सक्तीच्या मजुरीचा वापर केला गेल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी लागू असलेल्या टॅरिफची मुदत गुरुवारी मध्यरात्री संपत होती; ट्रम्प यांचे टॅरिफ शुक्रवारी मध्यरात्री १२:०१ वाजता (ईस्टर्न टाइम) लागू झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com