महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: कुंकूमार्चन प्रथेवर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट; नेटकऱ्यांनी घेतली शाळा

नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात कुंकूमार्चन हा प्रकार केला जातो.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवरात्रातील कुंकूमार्चन प्रथेबाबत एक पोस्ट लिहिली आहे. पण या पोस्टमुळं त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल व्हावं लागलं. त्यांनी या प्रथेबाबतचे जे संदर्भ दिले आहेत, त्यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले आहेत. (Jitendra Awhad Post on Kunku Marchan practice and he became trolled)

आव्हाडांची पोस्ट काय?

आव्हाडांनी ट्विटरवर पोस्ट करताना म्हटलं की, "कुंकूमार्चन म्हणजे दसऱ्यला देवीचx मंदिर बंद करताना देवीच्या गाभाऱ्यात आणि देवीवर पूर्णपणे कुंकू उधळण्यात येतं. कुंकवाचा थर जवळ जवळ 6 इंच इतका असतो. त्यानंतर देऊळ बंद करण्यात येतं. (Latest Marathi News)

सकाळी ते देऊळ उघडण्यात येतं आणि पहिल्यांदा पुजारी गाभाऱ्याचं निरीक्षण करतो. असंच तुळजा भवानीच्या मंदिरातील पुजाऱ्यानं निरीक्षण केल्यानंतर त्याला एक विलक्षण गोष्ट दिसली. त्यामुळं त्यानं त्याचे फोटोही काढले. (Marathi Tajya Batmya)

या फोटोंमध्ये त्याला काही पाऊलं दिसली, ही घटना फारच पवित्र आहे. या फोटोंमध्ये पाऊलं स्पष्टपणे दिसत आहेत. तुळजा भवानीच्या मंदिरात हे पारंपारिक आहे.

आव्हाड का झाले ट्रोल?

आव्हाडांच्या या पोस्टवर पुरोगामी वर्तुळातून टीका करण्यात आली आहे. आव्हाडांची पोस्ट म्हणजे पुरोगामी अंधश्रद्धा असं काहींनी म्हटलं आहे. तर महात्मा फुल्यांनी शतकापूर्वी सत्यशोधक समाज घडवला आणि आपण आजही चमत्कार शोधतो आहोत, असंही काही युजर्सचं म्हणणं आहे. त्याचबरोबर पुरोगामी वर्तुळातील काही विचारवंतांनीही आव्हाडांची ही पोस्ट शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.

एका बाजूला फुले-शाहू-आंबेडकरांचा जयघोष करायचा आणि दुसरीकडे अशा अंधश्रद्धा वाढवायच्या याला निव्वळ भंपकपणा म्हणतात, असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलंय. तर सनातन्यांचे सर्व विरोधक विवेकबुद्धी बाळगून असतात असं समजणं चूक आहे. एकाच वेळेस दोन्ही पार्टी मूर्ख असू शकतात. म्हणूनच प्रबोधनचा लढा अधिक जटील बनतो, असं ब्राईट्स संघटनेचे सदस्य कुमार नागे यांनी म्हटलं आहे.

उपरोधिक पोस्ट?

पण काही जणांनी आव्हाडांच्या बाजूनं बोलताना त्यांनी ही पोस्ट उपरोधिकपणे केली असावी, असंही म्हटलं आहे. म्हणजेच आव्हाडांना सांगायचं एक आहे पण त्यांनी ते थेटपणे न सांगता वेगळ्याचं पद्धतीनं हे सांगण्याचा प्रयत्न केला असेल असं आव्हाड समर्थकांचं म्हणणं आहे. पण यावर अद्याप आव्हाडांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: दिवाळीत शेअर बाजारात जोरदार वाढ; निफ्टी-सेन्सेक्स तेजीत, बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

Diwali 2025: हिंदू शास्त्रांनुसार 'या' 4 रोपांजवळ दिवा लावल्यास वाढते सौभाग्य

IND vs AUS : 'अरे, बॉलिंगवर पण लक्ष द्या'! आर अश्विन संतापला, गौतम गंभीरच्या रणनितीचे केले पोस्टमॉर्टम Video

Gold Price Today: दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या–चांदीच्या भावात घसरण; पुढील काही महिन्यांत 1.5 लाखांचा आकडा गाठणार?

Pune Crime : पुण्यात ऐकावे ते नवलच! दिवाळीनिमित्त फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज; सहा आरोपींना अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT