Raj Thackeray News 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : "राज ठाकरे भावी मुख्यमंत्री तर मग मी पंतप्रधान" ; NCP नेत्याचा खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray News: आज गुढीपाडव्यानिमित्त राजकीय पक्षांचे शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखई मुंबईत बॅनर लावले आहेत. आज शिवतीर्थवर मनसेचा मेळावा देखील आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज ठाकरे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सेना भवनसमोर हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी डिवचले आहे. (Latest Marathi News)

"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे" या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आज मनेसाचा गुढीपाडवा मेळावा देखील होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून भाषण करणार आहेत. या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Marathi Tajya Batmya)

राज ठाकरे भाषणातून उद्धव ठाकरे यांचा समाचार घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री उल्लेखावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. जितेंद्र आव्हाड टिव्ही ९ मराठीशी बोलत होते. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "राज ठाकरे भावी मुख्यमंत्री आहेत असं त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT