Jitendra Awhad said it is not acceptable to put pm Narendra Modi photo on garbage can in Arab country  
महाराष्ट्र बातम्या

...पण कचराकुंडीवर भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं अमान्य - जितेंद्र आव्हाड

सकाळ डिजिटल टीम

भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अरब देशांमधून या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची तसेच नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. मात्र या दरम्यान आणखी एक नवा वाद सुरू झाला आहे. (Jitendra Awhad said it is not acceptable to put pm Narendra Modi photo on garbage can in Arab country)

अरब देशातील कचराकुंड्यांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे देशातील राजकीय पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत याचा निषेध केला आहे.

अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. आम्ही मोदी आणि भाजपला या देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच पण आमचा मोदी विरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही या कृतीचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले आहेत.

एका टीव्ही चर्चेत नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चिंता वाढवत आहे. सौदी अरेबिया, युएई या भारताच्या मित्र देशांसह अनेक देशांनी या वक्तव्याचा निषेध केला असून भारताकडून कारवाईची मागणी केली आहे. अनेक देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून यावर उत्तर मागितले आहे. अरब देशांच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे, तर नवीन जिंदाल यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की या मुद्द्यावर कतारने सर्वात आधी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. या मुद्द्यावर कतारने राजदूताला बोलावून भारताने माफी मागावी, अशी मागणी केली होती. यानंतर सौदी अरेबिया, यूएईसह इतर अनेक देशांनीही या वक्तव्याचा निषेध केला. मात्र, सौदी अरेबियाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर केलेल्या कारवाईचेही स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT