Jitendra Awhad spoke about Sharad Pawar reaction to pm Modi Congress free India announcement  Esakal
महाराष्ट्र बातम्या

मोदींचं कॉंग्रेसबद्दल विधान अन् शरद पवारांच्या डोळ्यात पाणी; आव्हाडांनी सांगितला किस्सा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहेत. दरम्यान आज कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात सेवा त्याग सप्ताह उद्घाटन सोहळ्यात बोलतांना आव्हाडांनी राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच त्यांनी शरद पवार यांचे कॉंग्रेस पक्षाबद्दलचे विचार दाखवून देणारा किस्सा देखील यावेळी सांगितला.

अन् शरद पवारांच्या डोळ्यात पाणी आलं..

आव्हाडांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, पंतप्रधान मोदी ज्या दिवशी म्हणाले की, काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे, मी शरद पवार यांसोबत होतो. त्यादिवशी आधी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, असे आव्हाड म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की, "पवार साहेब म्हणाले जितेंद्र देशातून काँग्रेस विचार संपला तर खरंच अवघड होईल."

यावेळी बोलातना आव्हाड म्हणाले की, मी आश्चर्य चकित झालो की मला या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. मी अनेक दिवस कलमाडी साहेबांसोबत घातले आहेत आणि त्या माणसाला मी विसरू शकत नाही, असंही आव्हाड यावेळी म्हणाले. पवार साहेबांच्या जवळ मला दोन व्यक्ती घेउन गेल्या, एक म्हणजे पद्मसिह पाटील आणि सुरेश कलमाडी आणि म्हणून कलमाडी याचं पालिकेतील फोटो आला आणि वाईट वाटलं असंही आव्हाडांनी यावेळी सांगितलं.

कॉंग्रेसबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, मतभेद असतील तरी आम्ही एकत्र आहोत दाखवण्याची शक्ती फक्त काँग्रेस विचारांमध्ये आहे. काँग्रेस पक्षात विचारांची देवान घेवाण अणि मतभेद विसरून एकत्र येणे हीच काँग्रेसची संस्कृती आहे. ज्या ज्या व्यासपीठावर जायचं तिथं पुरोगामी विचाराचे बोलेल, संविधान टिकवण्यासाठी बोलेन एवढा विश्वास माझ्यावर नेत्याचा आहे. मरेपर्यंत जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या सोबतचं असेल असेही त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी हृदयाच्या आणि प्रेमाच्या भाषेमुळे देशातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले आणि तेच राहुल गांधी यांच्या डोळ्यात मला दिसतं आहे, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून तेच काम करत आहे. तो माणूस आता बदलला आहे, राहुल गांधी यांच्याबद्दल काय काय बोलेले, काय काय आरोप केले. आज तो माणूस २००० किमलोमिटर चालला आहे. त्यानें मोठा त्याग केला आहे.

भाजपला टोला..

जेव्हा जेव्हा यात्रा समोर येते तेव्हा पदयात्रा येथे रथयात्रा नाही असा टोला जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला लगावला. पदयात्रे दरम्यान मंदिर-मस्जिद-चर्च सगळीकडे जात आहेत, देश बदल रहा है असेही आव्हाड म्हणाले.

निवडणुकीत काय होईल मला माहिती नाही पण लोकांच्या मनात राहुल गांधी यांच्या विषयी अस्था निर्माण होत आहे. या माणसाने मेलव्यार आपल्या बापाचा चेहरा देखील बघितला नाही, आजीच्या गोळ्या त्यानी बघितल्या आहेत. इतकं झाल तरी ते लोकात मिसळत आहेत, हे सोप्प नाही, असे आव्हाड म्हणाले.

गांधींवर पहिला हल्ला पुण्यात..

महात्मा गांधी यांच्यावर पहिला 1935 मध्ये पुण्यात झाला. महाबळेश्वर मध्ये हाच नथुराम चाकू घेऊन महात्मा गांधी यांच्यावर धावत गेला. पण महात्मा गांधी यांनी त्याला माफ केल. ही या देशाची आणि गांधी यांची संस्कृती आहे. आज महात्मा गांधी यांच्याविषयी काहीही बोलतात पण त्यांनी जे केल टे कुणाच्या बापाला शक्य आहे का? असा सवालही आव्हाडांनी यावेळी केला.

भारतातील कुठलाही नेता जगात गेला तर पहिल्यांदा गांधीजींच्या समोर नतमस्तक होतो, जगातील कुठल्याही नंतर भारतात आला की नातामस्कत होतो हा देशच गांधीचा आहे. आपल्या महाराष्ट्रला नथुराम नावाचा काळा डाग लागला असल्याचे देखील आव्हाड म्हणाले.

'हर हर महादेव' निव्वळ विकृती

हर हर महादेव हा चित्रपट निव्वळ विकृती आहे. दादोजी कोंडदेव यांना तुम्ही आता बाहेर काढल आहे. तो आता संपला आहे, म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांना पुढे केले जाते अशी माझी शंका आहे. म्हणून असे चित्रपट दाखवले जात आहेत. अशा शब्दात हर महादेव चित्रपटवरून जितेंद्र आव्हाड यांनी झापलं.

निष्ठा वगैरे काही राहिली नाही

आधी आमच्या बापांना लिहायला येत नव्हतं यांनी चुकीचा इतिहास लिहिला, आज भारत-भारत म्हणून जिवंत आहे त्याचा एकमेव कारण म्हणजे संविधान. आज काल कोणते नेते कुठं जातील काही माहिती नाही. आज काल निष्ठा वगैरे काही राहिली नाही. रात्री काँग्रेस मध्ये तर सकाळी भाजप मध्ये. हे सगळे नेते घातपात करतात असेही आव्हाड म्हणाले.

पण त्याचं नाव असं आहे की..

श्रद्धा वालकर प्रकरणावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आफताब पूनावाला पारसी आहे, पण त्याचं नाव असं आहे की हेडलाईन्स घेऊन जातो. देशात नावावरून राजकरण केल जात आहे. अस्लम राईस नाव असल की या देशात अवघड आहे. मुस्लिमांना आज सांगावं लागतं की माझा देशावर प्रेम आहे पण त्यांनी 1947 सली सांगितलं की आम्ही जिना सोबत नाही भारताच आमचा देश आहे, असेही आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT