Jitendra Awhad News esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाराला 10 लाखांचं बक्षिस; भाजपच्या 'या' नेत्याचं विधान

सकाळ डिजिटल टीम

जालनाः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत असून आव्हाडांची जीभ छाटणाराला दहा लाखांचं बक्षिस जालन्यातल्या एका नेत्याने जाहीर केलं आहे.

मुंबईतल्या हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर जितेंद्र आव्हाड वादग्रस्त विधानं आणि ट्विट करीत आहेत. त्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला केला जातोय. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर संताप व्यक्त होतं आहे.

आज जितेंद्र आव्हाड यांनी आज एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणातात, '' रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा. महाभारतातून दुर्योधन, कर्ण काढून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघलशाही काढून शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा'' असं ट्विट त्यांनी केलं आहे.

या विधानानंतर भाजपकडून आव्हाडांवर जोरदार हल्ला होतोय. जालना भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी सांगितलं की, जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी दिसतील तिथे त्यांची जीभ जो छाटेल त्याला भाजपतर्फे १० लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाडांवर भाष्य केलं आहे. आव्हाड कधी कधी सगळ्या सीमा ओलांडतात, असं फडणवीस म्हणालेत. आव्हाडांच्या विधानानंतर राज्यात पुन्हा वाद उभा राहण्याची शक्यता दिसून येतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT