Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: “सगळ्यांना पाडता मग मुलाला का निवडून आणलं नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

Jitendra Awhad: अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या उमेदवारांना दम दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Jitendra Awhad: राज्यात निवडणुका शेवटच्या टप्प्यात येत आहेत. आता शेवटच्या टप्प्याची जोरदार तयारी सुरू आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या उमेदवारांना दम दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन, तुला पाडीन करत आहेत, मग तुम्हाला तुमच्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? ज्या बापाने मला घडवलं, त्या बापाचा हात सोडताना ह्दयात जराही कालवाकालव झाली नाही? असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

आव्हाडांनी पुढे म्हटलं आहे की, १९९१ साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखतं होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवलं. त्यानंतर वारंवारं सत्तेच्या वर्तुळात ठेवलं, ४ वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही, कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचाय असं का म्हटलं नाही. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पक्ष स्वत: ताब्यात घेतला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड ठाण्यात बोलत होते.

राज्याने दोन गद्दार पाहिले- जितेंद्र आव्हाड

पुढे बोलतन जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, आपलेपणा दाखवला ती मातोश्री फोडण्याचंच काम केलं. हे दोन्ही गद्दाऱ्या या महाराष्ट्राला कधीही आवडणार नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहास दोन गद्दारी ओळखल्या जातात. खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ. यांच्या अवलादींना महाराष्ट्राने कधीही ओळख दिली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत खंडोजी खोपडे आणि सूर्याडी पिसाळ या गद्दार लोकांना कायमचं संपवू टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT