job esakal
महाराष्ट्र बातम्या

Job : आरोग्य विभागात बंपर भरती! 'या' संवर्गातील ४ हजार ७५१ पदे भरली जाणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट ‘क’ संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण ४७५१ पदांपैकी तब्बल चार हजार पदे परिचारिकांची असून त्यासाठी येत्या २५ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत येणारी गट-क परिचर्या, तांत्रिक व अ तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व नियमानुसार लागू असणारे भत्ते दिले जाणार आहेत. रिक्त पदे सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार भरlली जाणार आहेत.

अधिपरिचारिक पदांचे विवरण..

अधिपरिचारिकांची ३,९७४ पदे भरली जाणार असून त्यातील १९५४ पदे खुल्या संवर्गासाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी ३२१ आणि अनुसूचित जातीसाठी ३३८ पदे तर उर्वरित पदे इतर संवर्गासाठी आहेत.

इतर पदे...

प्रयोगशाळा सहाय्यक १७०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११२, ग्रंथपाल १२, स्वच्छता निरीक्षक ९, ईसीजी तंत्रज्ञ ३६ ,आहारतज्ञ १८ ,औषधनिर्माता १६९ , कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार १९ , समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) ८६ , ग्रंथालय सहाय्यक १६ , व्यवसायोपचारतज्ञ/ ॲक्युपेशनथेरपीस्ट ७ , दूरध्वनी चालक १७ , महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख ०५ , अंधारखोली सहाय्यक १० , किरण सहाय्यक २३, सांख्यिकी सहाय्यक ३ , शिंपी १५ , वाहन चालक 34 , गृहपाल १६ अशा विविध पदांची जाहिरात संचालनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संकेतस्थळ ः https://www.med-edu.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT