johnson and johnson baby powder esakal
महाराष्ट्र बातम्या

High Court: 'जॉन्सन अँण्ड जॉन्सन'चं बेबी पावडर घातक आहे का? हायकोर्टात नेमकं झालं काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या 'बेबी पावडर' या उत्पादनाला हानिकारक ठरवत कारवाई केली होती. या कारवाईविरोधात आता कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र न्यायालयाने कंपनीला दिलासा दिलेला नाही. हे नेमकं प्रकरण काय ते पाहू...

Johnson & Johnson Baby Powder

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचे 'बेबी पावडर' हे उत्पादन अतिशय प्रसिद्ध आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या उत्पादनाविषयी वेगवेळ्या बाबी समोर येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने १५ सप्टेंबर रोजी बेबी पावडरवर कारवाई केली. या पावडरमध्ये लहान मुलांना प्रतिबंधित करणाऱ्या घटकांचं प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतात, असं एफडीएचं म्हणणं आहे. त्यामुळे या पावडरवर बंदीची कारवाई करण्यात आली.

मात्र या निर्णयाविरोधात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा निर्णय मनमानी आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. आज हायकोर्टाने कंपनीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर एफडीएने ज्या अहवालाच्या आधारे कारवाई केली तो कंपनीला उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत. १९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती दिलीय. एफडीएच्या बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे.

दरम्यान, या प्रकरणी केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात केंद्र सरकार काय भूमिका घेणार आणि कोणत्या अहवालाच्या आधारे एफडीएने कारवाई केली, तेही लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT