MPSC Exam sakal
महाराष्ट्र बातम्या

‘MPSC’कडून संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर! 5 जानेवारी व 2 फेब्रुवारीला ‘या’ परीक्षा; 1813 पदांची होणार भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बुधवारी संयुक्त पूर्व सेवा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बुधवारी संयुक्त पूर्व सेवा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली नसल्याने परीक्षा काही महिने पुढे गेल्या आहेत. आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

कोरोनामध्ये दोन वर्षे अशीच वाया गेलेल्या तरुणांना ‘एमपीएससी’ने वार्षिक कॅलेंडरप्रमाणे वेळेत परीक्षा, निकाल लावावेत, एवढीच माफक अपेक्षा आहे. आयोगाने गतवर्षी सुरवातीच्या पाच महिन्यांतच घेतलेली संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये झालीच नाही. आता विधानसभा निवडणूक होणार असल्याने ही परीक्षा थेट जानेवारी- फेब्रुवारीतच घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, तीन महिन्यांपूर्वी आयोगाने राज्य शासनाला विविध विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागितली होती. ती मागणीपत्रे प्राप्त होताच आयोगाने दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

  • विविध मंत्रालयातील प्रशासकीय विभाग : ५४ पदे

  • एमपीएससी : १ पद

  • राज्य कर निरीक्षक : २०९ पदे

  • पोलिस उपनिरीक्षक : २१६ पदे

  • एकूण पदसंख्या : ४८० पदे

  • अर्ज करण्याचा कालावधी : १४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४

  • परीक्षा : ५ जानेवारीला (३७ केंद्रांवर)

-------------------

  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

  • उद्योग निरीक्षक : ३९ पदे

  • कर सहायक : ४८२ पदे

  • तांत्रिक सहायक : पदे

  • बेलिफ, लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई कार्यालय : १७ पदे

  • लिपिक-टंकलेखक : ७८६ पदे

  • एकूण पदसंख्या : १,३३३ पदे

  • अर्ज करण्याचा कालावधी : १४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४

  • परीक्षा :२ फेब्रुवारीला (३७ केंद्रांवर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT