judge in the name of paying electricity bill three lakh rupees fraud crime  esakal
महाराष्ट्र बातम्या

Cyber Fraud : न्यायाधीशांनाच ३ लाखाचा गंडा; 'मोबाईलवर एक मॅसेज आला अन्...

सकाळ डिजिटल टीम

ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या अनेकवेळा पाहत असतो. दरम्यान, न्यायाधीशांची ऑनलाईन फसवणुक झाल्याची माहिती समोर आली आहे. वीज बिल भरण्याच्या नावाखाली भंडारा येथील न्यायाधीशांना एका भामट्याने तीन लाखाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(judge in the name of paying electricity bill three lakh rupees fraud crime )

भंडारा येथील चारुदत्त देशपांडे असे न्यायाधीशांचे नाव आहे. ऑनलाईन वीज बील भरण्यावरून त्यांची फसवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा येथील न्यायाधीश चारुदत्त लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता. त्यात वीज बिल थकीत असून तत्काळ न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे म्हटले.

यावरून न्या. देशपांडे यांनी संबंधित नंबरवर फोन केला. तेव्हा क्विक सपोर्ट हे ऐप इन्स्टॉल करण्यास सांगून त्यावर आलेली लिंक शेअर करून 11 रुपये पाठविण्यास सांगितले.

न्या. देशपांडे यांनी 11 रुपये नेट बँकिंगद्वारे जमा केले असता त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा 99 हजार 990 रुपये, दुसऱ्यांदा पुन्हा तेवढेच आणि तिसऱ्यांदा 99 हजार 998 रुपये असे एकूण 2 लाख 99 हजार 978 रुपये एका क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले.

हा प्रकार लक्षात येताच न्या. देशपांडे यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT