Kalyan Fire News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Kalyan Fire News: दुकानात झोपला अन् शटर बंद असल्याने अडकला; कामगाराचा आगीत तडफडून मृत्यू

दुकानात आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.

सकाळ डिजिटल टीम

कल्य़ाणमध्ये एका फुलाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली.

कल्याण रेल्वे स्टेशन भागामध्ये पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या एका फुलाच्या दुकानाला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकानाचे शटर बंद होते. एक कामगार दुकानात झोपला होता. त्यामुळे त्याला दुकानातून बाहेर पडता आलं नाही. या आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला.

करन असं या व्यक्तीचं नाव असून तो याच दुकानात काम करत होता. आपलं काम संपवून, दुकान बंद करून करन झोपला आणि त्यानंतर ही आग लागली. या आगीचं कारण अजून समोर आलेलं नाही. करनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT