Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: कामाख्या देवीचं नवस आज फिटणार; CM शिंदे आमदारांसह आज गुवाहाटीला जाणार

ज्यात सत्तांतर झालं आणि त्याचं मुख्य केंद्रस्थान राहिलं ते म्हणजे गुवाहाटी

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी अनेक घडामोडी घडल्या. राज्यात सत्तांतर झालं आणि त्याचं मुख्य केंद्रस्थान राहिलं ते म्हणजे गुवाहाटी. सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर व्हावं झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत.

आज सकाळी दहा वाजता मुंबई विमानतळावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार गुवाहाटीच्या दिशेने विशेष विमानाने उड्डाण करणार आहेत. तर गुवाहाटी विमानतळावर दुपारी 12 वाजता पोहचल्यानंतर पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार सत्तांतराच्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या रेडिसन ब्लू हॅाटेलमध्ये मुक्काम करणार आहेत.

आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदिच्छा भेट घेणार असल्याची माहीती समोर येत आहे. जून महिन्यामध्ये राज्यात राजकीय भूकंप झाला होता. यावेळी आसाममधील गुवाहाटी हे राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. नाराज झालेले नेते आणि एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये थांबले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

SCROLL FOR NEXT