Kangana Ranaut News esakal
महाराष्ट्र बातम्या

Kangana Ranaut: बंड अन् विभाजन सामान्य गोष्ट, राजकारण करु नये तर गोलगप्पे विकावे का?; एकनाथ शिंदेंसाठी कंगना मैदानात!

Kangana Ranaut News: कंगना रणौत एकनाथ शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरली आहे. कंगना रणौतने शंकराचार्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sandip Kapde

उत्तराखंडातील जोशीमठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री आवास येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी ठाकरे परिवाराने शंकराचार्यांचे आशीर्वाद घेतले आणि पादुका पूजन केले. शंकराचार्यांच्या भेटीदरम्यान पूर्ण ठाकरे परिवार उपस्थित होता. शं‍कराचार्यांनी उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले होते.  

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला ही गोष्ट माहीत आहे. जे लोक लोकांशी विश्वासघात करतात, ते हिंदू असू शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांना विश्वासघात करून मुख्यमंत्री पदावरून हटवले गेले, शं‍कराचार्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच पेटले होते.

दरम्यान कंगना रणौत एकनाथ शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरली आहे. कंगना रणौतने शंकराचार्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने म्हटले की, "राजकारणात एकमेकांशी गठबंधन, बंड आणि विभाजन होणे ही सामान्य गोष्ट आहे. काँग्रेस पार्टीचे विभाजन १९०७ आणि १९७१ साली झाले. जर राजकारणात नेते राजकारण करत नसतील तर ते गोलगप्पे विकतील का?"

"शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दावलीचा आणि धार्मिक प्रभावाचा दुरुपयोग केला आहे. धर्म म्हणतो की जर राजा प्रजेला शोषित करत असेल तर राजद्रोह हा शेवटचा धर्म आहे," असे म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.

कंगनाने असेही म्हटले की, "शंकराचार्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अपमानजनक शब्दांत गद्दार आणि विश्वासघाती म्हणत आमच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. अशा वक्तव्यांनी हिंदू धर्माची गरिमा खालवली आहे."

'धर्मात राजकारणाचा प्रवेश'-

शंकराचार्यांनी सांगितले की, "आपल्या धार्मिक स्थळांवर राजकारण्यांचा प्रवेश होत आहे. १२ ज्योतिर्लिंगांचा वर्णन शिव पुराणात आहे. केदार हिमालयात आहे आणि दिल्लीमध्ये केदारनाथ बनवणे योग्य नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT