Kangana Ranaut  esakal
महाराष्ट्र बातम्या

"इंद्रसुद्धा स्वर्गातून खाली येतात तुम्ही तर.." कंगणाने साधला ठाकरेंवर निशाणा Kangana Ranaut

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना

रुपेश नामदास

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केले.

त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी अखेर आयोगाने निकाल दिला आहे.

त्यानंतर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यातच अभिनेत्री कंगना राणावतने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कंगना राणावत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद चांगलाच रंगला होता. आयोगाच्या निकाला नंतर कंगनाने एक ट्विट केलं आहे.

त्यात तिने लिहिले आहे की "वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार.

एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT