maharashtra karnatak issue esakal
महाराष्ट्र बातम्या

कर्नाटकची माणसं आली महाराष्ट्रात झेंडा फडकावून गेली; राज्य स्थपानेपासून एवढी हिंमत कधीच झाली नव्हती!

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सध्या पेटलेला आहे. त्यातच कन्नड वेदिके या संघटनेची माणसं महाराष्ट्रात घुसले आणि त्यांनी झेंडा फडकवला. यावरुन संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

सीमाप्रश्नावर चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई ३ तारखेला कर्नाटकमध्ये चर्चेसाठी जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अक्कलकोट, जत आणि सोलापूरवर दावा केलाय. त्यामुळे हा वाद चिघळला आहे.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कन्नड वेदिके या संघटनेने तिकोंडी आणि उमराणी या गावामध्ये कर्नाटकचा झेंडा फडकविला आहे. या गावच्या लोकांनी आमचे प्रश्न सोडवा नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये सामील होऊ, असा इशाराच महाराष्ट्र सरकारला दिला होता. त्यानंतर काल संघटनेच्या लोकांनी गावात जावून कर्नाटकचा झेंडा फडकवला.

या प्रश्नावर आज संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. सरकारमधील काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय कन्नड वेदिके या संघटनेची हिंम्मत होणार नाही, असं राऊत म्हणाले आहेत. ''यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जे लोक घुसले त्यांच्यासाठीही आता नवस करणार की दिल्लीची वाट बघणार? महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर असं धाडस कुणीही केलं नव्हतं. परंतु आज एक दुबळं विकलांग आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेलं सरकार राज्यावर आहे त्यामुळे ही वेळ आलीय.'' असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला लोकांनी घरातच कोंडलं

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT