Kapil Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Kapil Patil : ‘मुंबई शिक्षक’मतदारसंघामध्ये पैसैवाटप;कपिल पाटील यांनी केला आरोप

मुंबई शिक्षक मतदारसंघात प्रथमच धनदांडग्यांकडून प्रचंड प्रमाणात पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आज केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघात प्रथमच धनदांडग्यांकडून प्रचंड प्रमाणात पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आज केला. प्रत्येकी पाच-दहा हजार रुपये देऊन शिक्षक विकत घेण्याची ही पद्धत अत्यंत निषेधार्ह असून शिक्षकी पैशाचा अवमान करणारी आहे.

याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेऊन त्यांना पुराव्यानिशी तक्रार देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. मुंबई शिक्षक मतदारसंघातून सलग तीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन पाटील यांनी आपले सहकारी, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

आमदार कपिल पाटील यावेळी मुंबई शिक्षक मतदार संघाच्या रिंगणात नसल्यामुळे मोठ्या राजकीय शक्तींनी ताकद लावली असली तरी पेन्शनच्या लढाईत सरकारी कर्मचाऱ्यांसोबत अग्रभागी असलेले सुभाष मोरे या निवडणुकीत उभे राहिले आहेत. ते विजयी होतील. या निवडणुकीत मुंबई बॅंकेला संधी मिळणार नाही, अशी आशाही पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

Ajit Pawar: ‘दादा परत या...’ बारामतीकरांची आर्त हाक; महिन्यानंतरही भावना ताज्याच

Uttarakhand Holi: होळीच्या रंगात न्हाली देवभूमी,धामींची कोट्यवधींच्या प्रकल्पांची मोठी भेट पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन?

12th Student Death : नियतीचा क्रूर खेळ! बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा Heart Attack ने मृत्यू; परीक्षेपूर्वी 'असं' काय घडलं? हातात पेन घेण्यापूर्वीच...

SCROLL FOR NEXT