Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Border Dispute : शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी

कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून तापला असून त्यावरुन राजकारण सुरू झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप करणं सुरू आहे. याच संदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती हाती येत आहे.

संजय राऊत यांना काल दिवसभरात धमकीचे दोन फोन कॉल्स आले आहेत. कर्नाटक सीमावादाविषयी शंभूराज देसाईंनी काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर राऊतांना या धमक्या आल्या आहेत. या पत्रकार परिषदेत देसाईंनी राऊतांना "आत्ताच जेलमधून सुटला आहात, पुन्हा जावं लागेल", अशा शब्दांत इशाराही दिला होता. त्यानंतर या धमक्या आल्या आहेत. कन्नड वेदिका संघटनेकडून धमक्या आल्याचा संशय आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा उफाळून आला आहे. या प्रश्नावरून राज्यात ब्लेमगेम सुरू आहे. कालच या मुद्द्यावर समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. कर्नाटक प्रश्न योग्य न हाताळल्याची टीका सातत्याने शिंदे फडणवीस करणारे संजय राऊत यांनी शांत राहण्याचा इशाराही देसाईंनी दिला. पुन्हा जेलमध्ये जायची वेळ येईल, अशा शब्दांत देसाईंनी सुनावल्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT