Karnataka Election Result 
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Election Result : पवारांच्या उमेदवाराला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शशिकला जोल्ले आहेत तरी कोण?

निपाणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसंच घडल्याची चर्चा

धनश्री ओतारी

निपाणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसंच घडल्याची चर्चा कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपच्या शशिकला जोल्ले यांचा विजय झाला. तर शरद पवार यांना धक्का बसला. उत्तम पाटील यांचा पराभव झाला आहे. तर पवारांच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या शशिकला जौल्ले आहेत तरी कोण? (Karnataka Election Result who bjp Candidate shashikala jolle defeated NCP candidate Uttam Patil )

शशिकला जोल्ले कोण आहेत?

2019 मध्ये निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री स्विकारले होते. त्यावेळी जोल्ले यांच्यारूपाने निपाणी तालुक्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले होते.

शशिकला यांचे पती अण्णासाहेब जोल्ले हे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शशिकला यांनी तीन वेळा हॅट्रिक साधली आहे. Karnataka Election Result

२००८ साली पराभव झाल्यानंतर २०१३ साली त्यांनी विजय मिळवत निपाणी मतदार संघात पहिल्या महिला आमदार म्हणून मान मिळवला.

यानंतर सलग ५ वर्षे मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासकामे केली. पक्ष वाढीसाठीही त्यांनी मोठे काम केले. यामुळेच त्यांना मंत्रीपद मिळाले होते.

जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून शशिकला जोल्ले यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. बीरेश्वर बँकेच्या माध्यमातून त्यांनी महिलांना उद्योग उभारले आहेत.Karnataka Election Result

हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीत सभा घेतली होती. त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होत. हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला होता. Karnataka Election Result

त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे उत्तमराव पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले होते. त्या ठिकाणी सभा घेत पवारांन फडणवीसांना सडेतोड उत्तर दिले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मतदानादरम्यान निपाणीत तळ ठोकला हेाता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT