Karnataka Election Sakal
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Election "लेकर बजरंगबली का आशीर्वाद, जनता चली काँग्रेस के साथ', म्हणत नागपुरात हनुमान चालिसाचं वाटप

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार हे स्पष्ट झालं आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. कर्नाटक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र काँग्रेसने कर्नाटक जिंकून भाजपला धक्का दिला.

कर्नाटकात प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबलीचं नाव घेत मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे राजकारण तापलं होतं. मात्र तरी देखील भाजपला दारूण पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजधानी असलेल्या नागपुरात, लेकर बजरंगबली का आशीर्वाद, "देश की जनता चली काँग्रेस के साथ", म्हणत काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल निमित्त दक्षिण नागपूर ब्लॉक काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस, सेवादल, युवक काँग्रेस, NSUI तर्फे मिठाई वाटप करण्यात येत आहे. यावेळी श्री हनुमान चालीसा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकंदरीतच बजरंगबलीच्या विधानाला काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT