cm eknath shinde sakal
महाराष्ट्र बातम्या

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा : CM बोम्मई

सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्याचा आमचा मानस आहे

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चर्चेने सोडवावा, या विधानावर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले.

आज गृहमंत्री कृष्णा येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद चर्चेने सोडवला पाहिजे. त्यांच्या या विधानावर पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल व निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. आम्ही युक्तिवादासाठी चांगली तयारी केली आहे. दरम्यान, त्यांनी चर्चा करण्याबाबत वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्याबाबत यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्याचा आमचा मानस आहे, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चेबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे सीमावाद हा प्रश्नच संपला आहे. जत तालुक्‍यातील ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्‍याचा निर्णय घेतला असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT