महाराष्ट्र

कर्नाटक घडामोडींना मुंबईतून बळ

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपने कर्नाटकातील राजीनामासत्रासंदर्भातील घडामोडींबद्दल मौन बाळगले असले तरी गेले काही दिवस या मोहिमेला मुंबईतून बळ मिळाले. गेले सात ते आठ महिने बंडखोर कन्नड आमदारांचे आदरातिथ्य भाजपत नव्याने प्रवेश केलेला एक नगरसेवक युवा पदाधिकाऱ्याच्या मदतीने करत असे.

कॉंग्रेसनेही या घडामोडींवर लक्ष ठेवले होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात या आमदारांच्या येण्याजाण्यावर कॉंग्रेस लक्ष ठेवून असे. मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्वप्रथम कर्नाटकातील काही आमदार भाजपकडे जात असून ते मुंबईत मुक्‍कामाला असल्याची माहिती दिल्लीतील श्रेष्ठींना पाठवली होती. या टिपऑफनुसार कर्नाटकातील संकटमोचक शिवकुमार यांनी काम सुरू करून जेडीएस-कॉंग्रेस संयुक्‍त सरकारला तारले होते.

आज बाहेर पडलेल्या आमदारांशी भाजपने मुंबई मुक्‍कामात संपर्क साधला होता, असे आता स्पष्ट झाले. मात्र अर्थातच आज भाजपने त्याबाबत मौन बाळगले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT