Dhananjay Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde: ''तुझ्या सामर्थ्यापुढे मी झुकणार नाही'' करुणा शर्मा यांनी धनंजय...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या करुणा शर्मा यांनी आजही धनंजय मुंडेंवर फेसबुक पोस्ट केलीय.

'Karuna dhananjay munde' या त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन आज सकाळी करुणा यांनी एक पोस्ट केलीय. खोट्या केसमध्ये अडकवणं, पैशाच्या जोरावर त्रास देणं; या कारनाम्यांनी मी झुकणार नाही, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

''माझ्या गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवून खोट्या केसमध्ये मला अडकवलं, घाणेरडे व्हीडिओ बनवून माझी गाडी आणि घर हिसकावलं... जेवढी ताकद लावायची तेवढी लाव. तुझ्या पैशांपुढे झुकली नाही आणि खोट्या ताकदीपुढेही. ही नारी शक्ती आहे.'' अशी पोस्ट करुणा यांनी केलीय.

मागील वर्षी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्यासाठी करुणा शर्मा गेल्या होत्या. परंतु त्यांच्या गाडीत रिव्हॉल्व्हर आढळून आलं शिवाय त्यांना महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यापोटी त्यांना जेलदेखील भोगावं लागलं.

परळीमधील राड्यानंतरही करुणा शर्मा यांनी आपला लढा सुरुच ठेवला आहे. फेसबुक लाईव्ह, पोस्ट याद्वारे त्या कायम आवाज उठत असतात. आजही त्यांनी थेट नाव न घेता आ. धनंजय मुंडे यांच्यावर ही पोस्ट केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaydatta Kshirsagar : मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'Welcome'साठी जयदत्त क्षीरसागर हेलिपॅडवर हजर, पण सभेला मात्र गैरहजर!

जितकी सुंदर तितकीच निर्दयी! 8.5 IMDb रेटिंगवाली ती कोरियन सीरिज जी तुम्हाला चांगलं-वाईटमधला फरकही करू देत नाही

IND vs SA, 1st ODI: विराटचा सेलिब्रेशनला नकार, तर रोहितची प्रशिक्षकाशी गंभीर चर्चा; सामन्यानंतरच्या Video ने वाढवले टेन्शन

Mumbai Local: गरम अन् ताजं जेवण मिळणार...! मुंबई ट्रेन प्रवास स्वादिष्ट होणार; रेल्वे केटरिंगचा मोठा मेगा प्लॅन तयार, वाचा...

आतातरी अर्ध्यातून शो सोडू... रितेश देशमुख 'बीबीमराठी६' चं होस्ट करणार समजताच नेटकऱ्यांनी दिले सल्ले; आठवण करून देत म्हणाले-

SCROLL FOR NEXT