Karyaksham MP Award to Nitin Gadkari sakal
महाराष्ट्र बातम्या

नितीन गडकरी यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार

२०२०-२१ सालचा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी (स्व.) माधवराव लिमये याच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा २०२०-२१ सालचा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार (Karyaksham (efficient) MP award)केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांना देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीतील नितीन गडकरी यांच्या मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली येथील निवासस्थानी गुरूवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

नितीन गडकरी बालपणापासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ते स्वंयसेवक असून त्यांनी संघ विचारधारेच्या विविध राजकीय संघटनामधून राजकीय कारर्किदीला सुरुवात केली. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय आहे. भूपृष्ठ वाहतूक जहाज बांधणी, जलसंसाधन नदीविकास आणि गंगासंरक्षण मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील आणि लोकसभेतील प्रभावी व कार्यक्षम मंत्री म्हणून देशात त्यांची ओळख आहे. या पुरस्कार सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा. डॉ.सुभाष भामरे, खा. हेमंत गोडसे, खा. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित असतील. यावर्षीपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षाआड पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT