ravindra dhangekar esakal
महाराष्ट्र बातम्या

Kasba ByPoll Result : ...म्हणून धंगेकर कधीच कारमध्ये बसत नाहीत; टॉकिजमध्येही गेले नाही

संतोष कानडे

पुणेः कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. धंगेकर हे मतमोजणी केंद्रावर पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे येथे दुचाकीवर पोहोचले.

कसबा पेठ निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये लढत झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली. यामध्ये रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे.

दरम्यान, आज सकाळी धंगेकर यांच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर ते मतमोजणी केंद्रावर पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी 'एबीपी माझा'वर भावना व्यक्त केल्या.

धंगेकर नेहमी दुचाकीवर प्रास करतात. ते कधीही चारचाकीमध्ये दिसत नाही. या मुद्द्यावर बोलतांना ते म्हणाले की, माझा विजय होणार, हे निश्चित आहे. हा जनतेचा विजय ठरणार आहे. मी चारचाकीमध्ये बसत नाही आणि सिनेमाही बघत नाही. मी आजपर्यंत चित्रपटगृहात गेलेलो नाही. अनेक मित्र सिनेमाची तिकीटं आणून देतात पण मी जात नाही. कारण मला जनतेची सेवा करायची आहे.

निवडणुका येत-जात असतात मी मात्र कायम जनतेची सेवा करत राहणार. रासनेंचा कारभार चांगला नव्हता, त्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचं धंगेकर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

हौस ऑफ बांबू : पुस्तकं, गप्पा आणि मॅजेस्टिक अशोकराव...!

SCROLL FOR NEXT