Arvind Sawant 
महाराष्ट्र बातम्या

कौरव-पांडव भाऊ-भाऊच होते, पण युद्धात धर्म-अधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे; सावंत यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - देशात विरोधकांची इंडिया आघाडी तयार झाली आहे. या आघाडीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना सामील झाली असून मुंबईत याच महिन्यात इंडिया आघाडीची बैठक आयोजित कऱण्यात आली आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीवर भाष्य केलं.

मोदींनी स्वातंत्र्य दिनी केलेलं भाषण पंतप्रधान म्हणून केले की भाजपचे नेते म्हणून केलं ? असा प्रश्न उपस्थित करत सावंत म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीसाठी मोदी यांचं कालचं भाषण होत. त्यांना कळलं की इंडिया आघाडी आता त्यांना मोठं आव्हान देणार आहे. महाराष्ट्र सदनमधील बैठकीतच त्यांनी सांगितलं होतं की, भाजपने नाही शिवसेनेने युती तोडली. सावंत पुढं म्हणाले की, मोदींचं शिवसेनेकडे सगळ्यात जास्त लक्ष आहे. शिवसेना कोणाची असेल तर ती उद्धव ठाकरेंची आहे हे पंतप्रधान मोदींना सुद्धा कळलं आहे.

महापालिका निवडणुका अजूनही होत नाहीये, याचा अर्थ लोकशाही नाहीये. महापालिका निवडणूक होणार नाही, आता लोकसभा निवडणुका होतील, त्यामुळे तशा प्रकारे लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला जात असल्याचंही सावंत यांनी सांगितलं.

शरद पवार-अजित पवार भेटीवर सावंत म्हणाले की, संभ्रम निर्माण केला आहे. ज्यांनी तो निर्माण केला, त्यांनी त्यांचं निवारण करायला पाहिजे. महाभारताच्या युद्धात कौरव आणि पांडव भाऊ-भाऊ होते. मात्र धर्मअधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे, असंही सावंत म्हणाले.

दुसरीकडे शरद पवार यांनी आपण इंडिया आघाडीत असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. तसेच भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT