महाराष्ट्र बातम्या

KCR : "बॅनरवर पांडुरंग अन् मटणावर ताव', उद्या विठोबाचं दर्शन अन् आज केसीआरच्या ताफ्याला मटण पार्टी

संतोष कानडे

सोलापूरः बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आषाढी वारीनिमित्त असलेल्या दौऱ्यासाठी केसीआर तेलंगणातून ६०० गाड्यांचा ताफा घेऊन आले आहेत.

मात्र आज धाराशिव येथे केसीआर यांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळींना खास मटणाचा बेत ठेवण्यात आलेला आहे. धाराशिव येथील मुरुम येथे त्यांच्यासह त्यांचं मंत्रिमंडळ आणि नेतेमंडळी;अशा साधारण दीड हजार जणांसाठी उस्मानाबादी बोकडाच्या मटणाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय आवडीनुसार चिकनदेखील ठेवण्यात आलेले आहे.

उद्या केसीआर हे आपल्या नेत्यांसह पांडुरंगाचं दर्शन घेणार आहेत. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार होती. मात्र राज्य शासनाने ही परवानगी नाकारली आहे. गुरुवारी एकादशी असूनही आज त्यांनी मटणाचा बेत आखल्याने चर्चा होऊ लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करुन बॅनरवर पांडूरंगाचे फोटो आणि पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचा बेत, असं म्हणत पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करु नका, असं आवाहन केलंय.

दरम्यान, सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन केसीआर हे सोलापुरात दाखल झालेले आहेत. आज दिवसभर ते धाराशिव येथे असून उद्या पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेतील. त्यानंतर ते तुळजापूर येथेही तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतील. आज त्यांचा सोलापुरात मुक्काम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप

SCROLL FOR NEXT