महाराष्ट्र बातम्या

परिवर्तनासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा - CM चंद्रशेखर राव

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याशीही भेट घेतली आहे. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केसीआर यांनी म्हटलंय की, देशात भाजपविरोधातील परिवर्तनासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. देशात चांगल्या पद्धतीने विकास होत नाहीये. त्यामुळे परिवर्तनासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री केसीआर यांनी म्हटलंय की, सध्या देशात चांगल्या पद्धतीने विकास होत नाहीये. नव्या संकल्पाने, नव्या आशेने पुढे जाण्याची वेळ आली आहे. यासाठीच पवार साहेबांची भेट घेतली. खूपच अनुभवी नेते आहेत. समविचारी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. याचं नेतृत्व शरद पवारांनी करावं. आम्ही बारामतीमध्येही भेटू. लवकरच आम्हा सगळ्यांची बैठक होईल. जे आमच्यासोबत येऊ इच्छितात, त्यांच्यासोबत आम्ही खांद्याला खांदे जुळवू. देशासमोर लवकरच आम्ही अजेंडा मांडू.

यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय की, आम्ही जेंव्हा राजकीय लोक भेटतो तेंव्हा राजकीय मुद्यांवर अधिक चर्चा होत असते. मात्र, आजची मीटिंग वेगळी होती. आज राजकीय चर्चा अधिक झाली नाही. विकासाच्या मुद्यांवर अधिक चर्चा केली. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या भलाईसाठी जे पाऊल उचलंल गेलं ते देशासाठी दिशादर्शक होते. यासंदर्भातही चर्चा झाली. आज देशातील बेरोजगारी, गरीबी, भूकबळी असो अशा समस्यांना तोंड देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली. विकासाच्या कामांवर चर्चा झाली. देशात एक विकासाचा माहोल तयार करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओह...सोलापूर जिल्ह्यात दररोज २५ लाखांचा मावा विक्री! कारवाईवरुन पोलिस अन्‌ अन्न- औषध प्रशासनाचे एकमेकांकडे बोट; शाळांसमोरच गुटखा-मावा विक्री, वाचा...

IPL 2026 Controvarsy: शार्दूल ठाकूर फंलदाजीला आलाच कसा? मुंबई इंडियन्सने Impact Player म्हणून दानिशला खेळवले, मग?

आजचे राशिभविष्य - २४ एप्रिल २०२६

ढिंग टांग : संकटमोचक संकटात…!

पुस्तक सफर : पाय जमिनीवर असलेल्या टेनिसपटूची कथा

SCROLL FOR NEXT