Kolhapur Bank Election Results Esakal
महाराष्ट्र बातम्या

KDCC Result : बँकेत सगळेच चोर..मतपेटीत चिठ्ठ्या, मतदारांनी लिहलं तरी काय?

मतदारांनी मतपत्रिकेवरच काही मजेशीर चिठ्ठ्या टाकल्या

सुनील पाटील, औंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : साहेब बँकेत सगळे चोर आहेत निवडणुकीत एकमेकांवर टीका करतात. नंतर गळ्यात पडतात. बँकेवर कायमस्वरूपी प्रशासक नेमा. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Kolhapur Bank Election Results) मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. पहिल्यांदा मतपेट्या उघडून मतपत्रिका बाहेर काढण्यात आल्या. यावेळी काही मतदारांनी मतपत्रिकेवरच काही मजेशीर चिठ्ठ्या टाकल्याचे दिसून आले. (Kolhapur Bank Election Results News)

एका चिठ्ठीत असे लिहले होते की, साहेब बँकेत सगळेच चोर निवडणूक आले की एकमेकांवर टीका, नंतर गळ्यात गळ्यात पडतात. त्यामुळे बँकेवर प्रशासक नेमा. असा मजकूर लिहिला होता. मुश्रीफ साहेब यांच्या एका समर्थकान कागलच्या राजकारणाचे गणितच चिठ्ठीतून सांगितले. मुश्रीफ साहेबांच्या जवळ एक टोळके आहे. निवडणूक आली की ते साहेबांच्या जवळ जाते. आणि कुठेच काम होऊ देत नाही. समरजीत घाटगे (Samarjeet Ghatge)यांच्या जवळ पण असाच एक गट आहे. तो कोणाचीच काम होऊ देत नाही. अशा काही चिठ्ठीतून मतदारांनी आपली खंत व्यक्त केली.

मतदारांनी मतपत्रिकेवरच काही मजेशीर चिठ्ठ्या टाकल्या

दरम्यान सकाळी आठ वाजता मतपेट्या उघडून मतपत्रिका यांचे वर्गीकरण करण्यात आले त्यानंतर गटनिहाय मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होईल. अशी माहिती निवडणूक अधिकारी काकडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT