Ketaki Chitale News | Sadabhau Khot News 
महाराष्ट्र बातम्या

केतकी चितळेचं सदाभाऊंकडून समर्थन; म्हणाले, ती कणखर...

आक्षेपार्ह शब्दात शरद पवारांवर टीका केल्यानं केतकी चितळेला अटक झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचं रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलं आहे. तुम्ही इतरांवर बोलता तेव्हा तेव्हा तुमची नैतिकता कुठे जाते? असा सवाल करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. (Ketki Chitale support from Sadabhau Khota)

खोत म्हणाले, केतकी चितळे ही कणखर आहे, कारण कोर्टात कुठलाही वकील न देता तीनं एकटीनं आपली बाजू मांडली. त्यामुळं तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. केतकीच्या पोस्टवर तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या, हे धंदे आता बंद करा.

सरकार पुरस्कृत दहशतवाद तुम्ही राज्यात वाढवत आहात का? तुमच्या पोलिसांवर तुमचा विश्वास नाहीए का? हा ही या निमित्तानं मुद्दा पुढे येतो. दुसऱ्या बाजूला या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय पदव्या दिलेल्या होत्या. त्यांच्या पत्नीबद्दल तुम्ही काय बोलले होते. चंद्रकांत पाटलांबद्दल तुम्ही काय बोलला होतात. यावेळी कुठे गेली ती नैतिकता? आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची चीड निर्माण होते तेव्हा एक समाज म्हणून तिला टार्गेट केलं जातं, असंही यावेळी केतकीची बाजू घेताना सदाभाऊ खोत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT