Girish mahajan vs Eknath Khadse  esakal
महाराष्ट्र बातम्या

Khadse vs Mahajan : 'मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच', विधानपरिषदेत खडसे आणि मंत्री महाजनांमध्ये जुंपली

सकाळ डिजिटल टीम

Khadse vs Mahajan : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेला वाकयुद्ध संपूर्ण राज्याला परिचित आहे. जिल्हास्तरावर असो की राज्यस्तरावर हे दोघेही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचाच प्रत्यय आज विधान परिषदेमध्ये आला.

यावेळी खडसे मंत्री गिरीश महानजांना म्हणाले कि, शेतकऱ्यांचा ५० टक्के कापूस हा अजूनही घरात पडून आहे, हा प्रश्न तुम्ही सोडवा. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, असे बोलले जाते, पण मला वाटत नाही. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असता तर तुम्ही जळगावचे पालकमंत्री झाला असतात असे खडसे म्हणाले

कापसाच्या प्रश्नावर सरकारच्या वतीने उत्तर देतांना महाजन यांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. कापसाचा प्रश्न गंभीरच आहे. याविषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलले आहेत.कापूस निर्यात व भाववाढी संदर्भात ही चर्चा झाली. त्यामुळे अधिवेशन संपण्यापुर्वीच यावर सरकारच्या वतीने ठोस घोषणा केली जाईल. असे महाजन म्हणाले

मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे की नाही? याची काळजी करू नये. मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे, तुमची अवस्था काय आहे? हे पहा. तुम्ही कुठे होतात आणि कुठे आलात. गावची ग्रामंपचायत देखील तुमच्या ताब्यात नाही, जिल्हा बॅंकेतून तुम्ही गेलात, नगर परिषद तुमच्याकडे नाही. असा टोला महाजन यांनी खडसेंना लगावला.

कापूस प्रश्नावर मी कडक उपोषण केले होते, पण काही जणांना माझे उपोषण सुरूच राहावे आणि मी खपलो पाहिजे असे वाटत होते, असा आरोप देखील त्यांनी केला. पण तेव्हा गोपीनाथ मुंडे व इतर नेत्यांनी मला उपोषण सोडायला लावले, असेही महाजन म्हणाले. महाजनांनी सभागृहात थेट हल्लाच चढवल्याने त्याला खडसेंकडून देखील प्रत्युत्तर दिले गेले. यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT