Nana Patole  
महाराष्ट्र बातम्या

Khalapur Irshalwadi Landslide : वेळीच दखल घेतली असती तर...; इर्शाळवाडीतून नाना पटोले सरकारवर संतप्त

सकाळ डिजिटल टीम

रायगड : रायकड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत रात्रीच्या वेळी डोंगराची कडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत १० जणांना प्राण गमवावा लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी असून सर्वच राजकीय पक्षाचे नेते इर्शाळवाडीत दाखल झाले असून पीडितांना धीर देत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील इर्शाळवाडीला भेट दिली.

नाना पटोले यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पटोले यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधून दुर्घटनेची माहिती घेतली. या घटनेतून सुखरूप वाचलेल्यांना नाना पटोले यांनी आधार दिला. सरकारने तातडीने लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

इर्शाळवाडीतील घटना अत्यंत दुःखद आहे. वेळीच या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असते तर नाहक बळी गेले नसते. सरकारने योग्यवेळी दखल घेतली नाही. मागील तीन चार दिवसापासून अतिवृष्टीचा इशारा दिला जात असताना धोकादायक, दरडप्रवण भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवायला हवं होतं. आतातरी सरकारने जलदगतीने हालचाली करुन लोकांना सर्व प्रकारची मदत मिळेल याची व्यवस्था करावी, अस पटोले म्हणाले.

दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जखमी आहेत. घटनास्थळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असून मुख्यमंत्री तब्बल सव्वातास पायी चालून घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र घटनास्थळी संततधार सुरू असल्याने बचाव कार्य होत नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT