

NEET Paper Leak: CBI Gives Clean Chit to Alleged Kingpin
esakal
नवी दिल्ली: NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी ३४ दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. काल गुरुवार मध्यरात्री पेपरफुटीविरोधात नवीन काय आणि कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. मात्र NEET-UG 2024 पेपरफुटी प्रकरणात सुरुवातीला 'मुख्य सूत्रधार' म्हणून संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या संजीव कुमार ऊर्फ संजीव मुखिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठा दिलासा दिला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका चोरी किंवा तिच्या वितरणामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा मिळालेला नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. यामुळे 2026 च्या परीक्षा घोटाळ्यात नवीन कारवाई काय होणार असा सवाल उपस्थित होत आहे.