Khalapur Irshalwadi Landslide 
महाराष्ट्र बातम्या

Khalapur Irshalwadi Landslide: माझे माय-बाप मिळूदे... इर्शाळवाडी दुर्घटना, मुलीची आर्त हाक

Sandip Kapde

Khalapur Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीत अंगावर शहारा आणणारी घटना घडली आहे. काल (बुधवार) रात्री अकरा वाजता इर्शाळवाडीत लोक झोपी जात होते. तेव्हाच काळाने घात केला आणि इर्शाळवाडीत कुटुंबासाठी कालची रात्र काळरात्र ठरली.

इर्शाळवाडीत दरड कोसळली आहे. त्यामुळे ३० ते ४० कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत २७ जणांना वाचवण्यात आले. फक्त चिखल असल्यामुळे कोणतीही यंत्रणा तिथे पोहचत नाही. आता हेलीकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य राबवण्यात येणार आहे. घरांसोबत कुटुंबदेखील उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आपल्या मुलाबाळांना शोधण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला आहे. Khalapur Irshalwadi Landslide:

एक मुलगी तिच्या आई-बाबा शोधत घेत आहे. तिच्या डोळ्यातील अश्रूधारा थांबत नाहीत. मला माझे माय-बाप मिळूदे, अशी आर्क हाक ती मुलगी मारत आहे. टीव्ही नाईन शी बोलताना त्या मुलीचा बांध फुटला. डोक्याला हात मारत ती एकच विनंती करत होती. माझे माय-बाप मिळूदे, त्यांचा अजून पत्ता नाही लागला, असे ती मुलगी सांगत होती.

नातेवाईकांसाठी टेन्ट उभारण्यात आले आहेत. मात्र त्यांची आपल्या लेकरांना शोधण्याची धावपळ थांबली नाही. काही लहान मुले आपल्या आई वडीलांना शोधत आहेत.

तर एक आजी तिच्या मुलांना शोधत आहेत. "डोंखर खचला, मातीचा डोंगर खचला माझी मुलं घरात होती दबल्या गेली. घरातील सगळी माणसे गेली, अता आमचं कोणी राहंल नागी, असे एका आजीने सांगितले. महिलांनी हंबरडा फोडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT