Khashaba Jadhav_Raju Shetti 
महाराष्ट्र बातम्या

Khashaba Jadhav: नियम डावलून अंबानींना पद्मभूषण अन् खाशाबा जाधवांना...; राजू शेट्टींच्या पोस्टनं वेधलं लक्ष

खाशाबा जाधव यांनी भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचा पदक स्विकारतानाचा व्हिडिओ ऑलिम्पक असोसिएशननं तब्बल ७१ वर्षांनंतर नुकताच प्रकाशित केला. याद्वारे खाशाबांचा एकप्रकारे सन्मानच करण्यात आला आहे.

पण भारताचं नाव जगात उज्वल करणारा हा खेळाडू अद्यापही नागरी पुरस्कारापासून वंचित आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषणनं गौरविण्यात यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. (Khashaba Jadhav PadmaBhushan Purskar Raju Shetti tweet Modi Govt)

शेट्टी यांनी ट्विट करत आपली मागणी केंद्र सरकारकडं मांडली आहे. त्यांनी म्हटलं, "लोकवर्गणीतून खाशाबा जाधव यांनी मिळविलेल्या पहिल्या कांस्य पदकाच्या यशाचा व्हीडीओ ७१ वर्षांनी जागतिक ऑलिंपिकमध्ये दाखवून त्यांचा मोठा सन्मान केला आहे. (Marathi Tajya Batmya)

केंद्र सरकारने नियम व कायदे बाजूला ठेवून धीरूभाई अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतीना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिला. मात्र, स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू असलेल्या खाशाबा जाधव या शेतकऱ्याच्या मुलाला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देताना हेच केंद्र सरकार नियम व कायदे दाखवून टाळाटाळ करत आहे. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग करत त्यांनी ही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जिंकलं पदक

हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये ५२ किलो वजनी गटात फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. देशाला स्वतंत्र भारतात पहिलं ऑलिम्पक पदक मिळवून दिलं होतं. त्यांच्या या अतुलनिय कामगिरीसाठी त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, भारतरत्नच काय तर इतर पद्म पुरस्कारांपासूनही ते अद्याप वंचित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT