महाराष्ट्र बातम्या

Drugs Case | किरण गोसावीची दिवाळी आता तुरुंगातच! कोठडीत वाढ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी (mumbai cruise drugs party) प्रकरणातील पंच किरण गोसावी (kiran gosavi) याची दिवाळी आता तुरुंगातच जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोर्टाकडून गोसावीला आजही दिलासा मिळालेला नसून त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

आठ दिवसांची पोलीस कोठडी आज संपली होती...

आर्यन खान प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली आठ दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाने गोसावीची अजून 3 दिवसाची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. शिवाजी नगर कोर्टाने आज त्याच्या कोठडीत वाढ केल्याने किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

पोलीस कोठडीत 8 तारखेपर्यंत वाढ

गोसावीवर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही 5 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती वकिलांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

SCROLL FOR NEXT