Kiran Sali removed Shiv Sena leader Neelam Gorhe from WhatsApp group maharashtra politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना-शिंदे गटाचा वाद 'व्हॉट्सऍप लेव्हल'वर; नीलम गोऱ्हेंना ग्रुपमधून काढलं

सकाळ डिजिटल टीम

पुणे : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट फडली असून शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा गट आणि एकनाथ शिंदे यांचा दूसरा गट यांच्यात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरु आहे. शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील अनेक शिवसेना नेते पदाधीकाऱ्यांनी ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला, यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्याकडून पक्ष पुर्नबांधणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान शिंदे गटात देखील आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात 'व्हॉट्सॲप वॉर' रंगल्याचे दिसत आहे.

शिवसेना कोणाची या मुद्द्यावरुन गेल्या महिन्याभरापासून घमासान सुरू आहे. ही लढाई थेट सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. त्यावर आज सुनावणी झाली असून निर्णय उद्या होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या निर्णय येऊ शकतो. मात्र यादरम्यान दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील वाद चिघळताना दिसत आहे. काय पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला केल्याचा प्रकार घडला, यानंतर या दोन्ही गटातील वाद आता व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत पोहचला आहे.

नेमकं काय झालं?

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेल्या किरण साळी यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी युवासेनेच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे. त्यांनी आता विधान परिषदेचे सभापती नीलम गोऱ्हे यांना व्हॉट्सॲप ग्रुप मधून काढून टाकल्याचे समोर आले आहे. किरण साळी यांनी २०१८ मध्ये शिवसेना - युवासेना पत्रकार मित्र असा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे. या ग्रुप मध्ये अनेक पत्रकरांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते मंडळी देखील आहेत. या ग्रुप मध्ये स्वतः नीलम गोऱ्हे देखील सक्रिय होत्या आणि राजकीय भूमिका मांडत होत्या. दरम्यान काल पुण्यात सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर या दोन्ही गटातील वाद थेट व्हॉट्सॲप ग्रुप पर्यंत पोहचला आहे.

किरण साळी हे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय आहेत, ते गेले अनेक वर्ष झाले शिवसेनेच काम करत आहेत. साळी यांनी युवासेनेचे राज्य सहसचिव म्हणून काम असून युवासेनेतून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. काल उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला होता. त्यानंतर हा वाद आता आणखी चिघळताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT