Kirit Somaiya Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"अजित पवारांकडून 1200 कोटींचा घोटाळा, जप्तीच्या कारवाईला कोर्टाची मान्यता"

जरंडेश्वर साखर कारखान्याबद्दल किरीट सोमय्यांनी हे ट्विट केलं आहे.

सुधीर काकडे

साताऱ्यामधील कोरेगाव परिसरातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित जमीन, इमारत, प्लांट, मशीन अशा 65 कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने जप्ती केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MMCB) गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Deputy Chief Minister Ajit Pawar) मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर ही जप्तीची कारवाई करण्यात आली होती. याबद्दल किरीट सोमय्यांनी आता एक नवी माहिती समोर आणली आहे.

"जरंडेश्वर साखर कारखान्याची ईडीनं केलेल्या जप्तीची पुष्टी करणाऱ्या मुंबई न्यायालयाचं मी स्वागत करतो. अजित पवारांनी १२०० कोटींचा घोटाळा केला आहे. मी ईडी आणि भारत सरकारला विनंती करतो की हा साखर कारखाना जरंडेश्वर सहकारी संस्थेच्या 27000 मूळ सदस्यांना, शेतकर्‍यांना सोपवावा." असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खाजगीरित्या विकत घेतला गेला आला. अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT