Kirit Somaiya Target Hasan Mushrif esakal
महाराष्ट्र बातम्या

आता सोमय्यांच्या निशाण्यावर मुश्रीफ, आयकर विभागाला दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

पुणे : किरीट सोमय्या आज हसन मुश्रिफांच्या कंपन्यांची पाहणी करण्यासाठी पुणे (Kirit Somaiya Pune Visit) दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप केले आहेत. मुश्रीफ कुटुंबीयांनी तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार (100 Crore Money Laundering Allegations on Hasan Mushrif) केला आहे. हा पैसा ४७ कंपन्यांमधून आला आहे. यामध्ये शेल कंपन्या देखील आहेत, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले. आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे सरकार हसन मुश्रिफांवर कारवाई करणार नाही. त्यामुळे आयकर विभागाला तक्रार दिली. मुश्रिफांच्या बेनामी संपत्तीची सर्व माहिती आयकर विभागाला दिली. मुश्रीफ कुटुंबीयांकडे ४७ कंपन्यांकडून पैसे आलेत. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी १०० कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक व्यवहार केला. हा पैसा कोणत्या कंत्राटदाराकडून आला? याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. हसन मुश्रीफांची बेनामी संपत्त करा, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली.

भारत सरकारची मुश्रिफांविरोधात याचिका -

मुश्रीफ कुटुंबीयांकडे शेल कंपन्यांतून हा पैसा आला आहे. हा पैसा भ्रष्टाचारातून आलेला आहे. ठाकरे सरकारने त्याची चौकशी अद्याप का केलेली नाही? असा सवाल देखील सोमय्यांनी उपस्थित केला. भारत सरकारने मुश्रीफांविरोधात पुणे सत्र न्यायालयाने स्वतः याचिका दाखल केली आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात देखील दाखल केली. आता हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी, बेनामी कायदा, आय़कर विभाग, मनी लाँडरींग याअंतर्गत कारवाई सुरू झाली आहे, असंही सोमय्यांनी सांगितलं.

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांवर ठाकरे-पवार सरकार कारवाई करणार नाही. कारण, दोन्ही कुटुंब घोटाळेबाज आहेत. मुश्रीफांवर कारवाई केली तर आदित्य ठाकरेंवर कारवाई करावी लागेल. त्यानंतर अजित पवारांवर कारवाई करावी लागेल. त्यामुळे एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाला वाचवत आहे, असा आरोप देखील मुश्रीफांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT