किरीट सोमय्या sakal
महाराष्ट्र बातम्या

चार वाजता काढणार घोटाळा बाहेर; सोमय्यांच्या रडारवर आणखी किती नेते?

अर्चना बनगे

कोल्हापूर : भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी शक्ती दे, महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी अंबाबाईकडे मी प्रार्थना केली आहे. अंबाबाईची माझ्यावर कृपा आहे म्हणूनच मी कोल्हापूरला पोहोचलो आहे. यंत्रणेतला घोटाळा बाहेर काढण्यासाठी आज मी चार वाजता पुरावा देणार आहे. असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुढे ते म्हणाले, अंबाबाईची माझ्यावर कृपादृष्टी आहे, म्हणूनच मी कोल्हापुरात येताच कोर्टाची सुनावणी सुरू झाली. माझ्यावर हल्ला करणाऱ्या भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना अटक झाली. ईडीची कारवाई सुरू होतात काहीजण रुग्णालयात भरती होतात, तर काही जण पळून जातात असा टोला ही अडसूळांना लगावला.

अंबाबाईची माझ्यावर कृपादृष्टी आहे, म्हणूनच मी कोल्हापुरात येताच कोर्टाची सुनावणी सुरू झाली.

उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

कालपासून रस्त्यावर विविध ठिकाणी आणि रात्री-मध्यरात्री रस्त्यात कार्यकर्ते थांबून मला प्रतिसाद देत आहेत. ही क्रांतीची सुरवात आहे. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आमचा संकल्प आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारची मुलुंडची जागा हॉस्पिटल बनवण्यासाठी घेतली. ती जागा त्यांचा मित्र, बिल्डर पार्टनर यांना ५ ऑक्टोबरला ६५ कोटीमंध्ये दिली. आणि ६ ऑक्टोबरला तीच जागा २१०० कोटींमध्ये विकत घेण्याचा निर्णय ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेने घेतला. आम्ही तक्रार केली. लोकायुक्तमध्ये सुनावणी सुरू झाली, आणि त्यानंतर सरकारने सांगितले की आम्ही हा निर्णय रद्द केला. याचसाठी आज संध्याकाळी पुरावे देणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT