Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर : सोमय्या

Kiran Mahanavar

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनिल देशमुख यांच्यानंतर पुढील नंबर अनिल परब यांचा असेल’, असा दावा सोमय्यांनी केला. (Kirit Somaiya on Anil Deshmukh arrest)

अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री एकच्या सुमारास सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. या कारवाईनंतर किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला. यात सोमय्या म्हणतात, “अखेर अनिल देशमुख यांना अटक झाली. १०० कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार आहे. १०० कोटींच्या वसुलीपैकी किती पैसे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या खात्यात गेले, हे आता उघड होईल”

रत्नागिरीमधील दापोली येथे असलेल्या हॉटेलच्या बांधकामाबाबत सोमय्या यांनी परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टात सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा देखील दाखल केला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ मध्येही तत्कालीन आघाडी सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणली होती. आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री आणि प्रमुख नेत्यांना टार्गेट करत महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT