किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आज मुरगूडपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  sakal
महाराष्ट्र बातम्या

सोमय्यांनी दिली मुश्रीफांविरोधात तक्रार; आता राज्यपालांना ही भेटणार

ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्या विरोधात आज मुरगूड (Murgud)पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.

अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर किरीट सोमय्या कळंबा मार्गे इस्पुरली तुरंबे मुदाळतिट्टा या मार्गाने मुरगुड मध्ये दाखल झाले. गावागावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती तुरुंबे आणि मुदाळ तिठा येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुरगुडमध्ये आल्यावर त्यांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

किरीट सोमय्या राज्यपालांना भेटून करणार तक्रार . दिल्ली येथे मानवाधिकार आयोग यांच्याकडे देखील दाद मागणार आहेत.

किरीट सोमय्या येणार म्हणून मुरगुडमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुरगूड ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पोलीस ठाण्याबाहेर आल्यावर सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मानवाधिकाराकडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते.

राज्यपालांना भेटणार

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, मला सुरवातीला कोल्हापुरात येऊ दिले नाही. त्या बद्दल राज्यपालांना भेटून तक्रार करणार आहे. तसेच दिल्ली येथे मानवाधिकार आयोग यांच्याकडे देखील दाद मागणार आहे. असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT