politics esakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल परब अन् ठाकरे सरकारवर सोमय्यांचा निशाणा, म्हणाले...

ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे.

मागील काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांच्यावर दापोली (Dapoli) येथे दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच असा इशाराही सोमय्या यांनी ट्विटद्वारे दिला होता. आता पुन्हा एकदा ट्विट करुन त्यांनी अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट बेकादेशीर असल्याचे ट्विट करत ठाकरे सरकारवर आणि परब यांच्यावर निशाणा साधला आहे. (Political News)

ते म्हणतात, ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे. त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे. असे एफिडेविट महाराष्ट्र शासनाने काल लोकायुक्त यांचा कडील सुनावणीत दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी याविषयी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, एक नाही तर दोन अनधिकृत रिसॉर्ट अनिल परब यांनी बांधले आहेत. ज्या रिपोर्टची चौकशी झाली, ज्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्या रिसॉर्टचे नाव साई रिसॉर्ट एनएक्स आहे. अनिल परब यांनी जे रिसॉर्ट लपवण्याचा हट्टाहास केला, त्याचे नाव सी काँच रिसॉर्ट असे आहे. जी केंद्राची टीम आली होती, त्यांनी महाराष्ट्र सरकारला स्पष्टपणे सांगितले होते की, दापोली आणि मुरुडच्या समुद्र किनारी असलेले हे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत आहेत. दोन्ही रिसॉर्टमधील मालकांनी सीआरझेडचा भंग केला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांचा फक्त साई रिसॉर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. जो सी काँच रिसॉर्ट आहे त्याला लागून दुसरा रिसॉर्ट आहे, त्याला वाचवण्याचे पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या धरतीला हे अनधिकृत बांधकामाच्या रिसॉर्टच्या पापापासून मुक्त करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT