Kirit Somaiya  Sakal
महाराष्ट्र बातम्या

माझ्या नावाने बनावट सहीची FIR; कारवाई न झाल्यास राज्यपालांना भेटणार

रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलिस ठाण्यात भेटायला गेलेल्या भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.

दत्ता लवांडे

मुंबई : रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलिस ठाण्यात भेटायला गेलेल्या भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर आपण पोलिसात तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आपली खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून ते आज खार पोलिस स्टेशन येथे पोहोचले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटून त्यांना दुखापत झाली होती. त्यासंदर्भात आपण तक्रार करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. त्यानंतर ते काल दिल्लीत देशाच्या गृहसचिवांना भेटायला गेले होते. केंद्रीय सुरक्षा असताना असे हल्ले होतात याबाबतीत त्यांनी दिल्लीत चर्चा केली होती. याप्रकरणी त्यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.

दरम्यान खार पोलिस स्टेशन येथे त्यांच्या नावाने तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. "दाखल करण्यात आलेली तक्रार मी दिलेली नसून माझ्या नावाने बोगस एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे." असं ते म्हणाले. मुंबईचे पोलिस आयुक्त यांनी आपली खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "दाखल केलेल्या एफआयआरवर माझी सही नाही, त्यांनी दाखल केलेल्या बनावट एफआयआरविरोधात मी तक्रार करणार आहे." असं ते म्हणाले.

"वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कमांडोची मारहाण शिवसेनेच्या गुंडांनी केली आहे. ते सेक्शन उद्धव ठाकरे यांनी लावू दिले नाही आणि माझ्या नावाने बोगस एफआयआर दाखल केली आहे." असा आरोप त्यांनी केला असून "आता मी माझी तक्रार दाखल करणार आहे, शिवसेनेच्या गुंडांवर कारवाई झाली पाहिजे, न झाल्यास मी राज्यपालांची भेट घेणार आहे." असं ते बोलताना म्हणाले. तसेच याप्रकरणा न्याय मिळाला नाही तर आपण कोर्टात जाणार असल्याचं त्यांना माध्यमांना बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT