Kirit Somaiya Criticize Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

राऊतांवरील ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

कितीही दबाव टाका कारवाई होणारच असे देखील किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanaj Raut) यांची अलिबागमधील मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान,1 हजार 48 कोटींचा घोटाळा ही कारवाईची सुरुवात आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो मोदींवर यांनी आरोप केला. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. (Kirit Somaiya Reaction After ED Action On Shivsena Leader Sanjay Raut)

सोमय्या म्हणाले की, मागील दोन महिन्यापासून राऊत यांनी ज्या पद्धतीने आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो. राऊत यांना वाटत पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करू पण कितीही दबाव टाका असे म्हणत आम्हाला फरक पडत नाही. कारवाई होणारच असे देखील किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत, दिलीप वळसे पाटील यांची नौटंकी उघडी पडली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

ईडी कारवाई करणार असल्याने राऊतांचा खटाटोप सुरू होता पूर्वकल्पना असल्याने राऊतांनी 55 लाख परत केले. पत्राचाळ घोटाळ्यात मोठा घोटाळा केलाय अलिबाग आणि दादरमधली मालमत्ता जप्त झाली आहे, असे म्हणत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे असेदेखील सोमय्या म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला पाहिजे होता. मात्र उद्धव ठाकरेंना असे वाटत की, ते माफीया सेनेचे माफिया सरकार असल्याची टीकादेखील सोमय्या यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT