kirit somaiya Udhhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

सोमय्या म्हणतात, माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच

याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार - सोमय्या

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार - सोमय्या

पुणे महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात ते खाली पडले असल्याने त्यांना दुखापतही झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली असून आरोपप्रत्यारोप सुरु झाले. आता भाजपाचे किरीट सोमय्या यांना रुग्णालयातून सुखरुप घरी आणण्यात आले आहे.

शिवसैनिकांनी केलेला या आक्रमक हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (cm uddhav thackeray) आदेशनानुसारच झाला असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्याकडे तक्रार करणार असून त्यासाठी गुरुवारी दिल्लीला जाणार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक तिखट प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढू असेही भाजपाचे नेते म्हणाले आहेत.

नेमकं घडलं तरी काय ?

सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना तीन-चार शिवसैनिकांनी त्यांना अडवले "तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाहीत, सेलेक्टिव्ह प्रकरणावर काय चर्चा करता" असा जाब विचारला. त्यावर सोमय्या यांनी "मला माहिती द्या मी त्याबद्दल ही प्रशासनाशी बोलतो" असे सांगितले. त्याच वेळी नव्या प्रशासकीय इमारती कडून शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्या कडे आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये प्रयत्न केला. पण आक्रमक झालेले शिवसैनिक तुटून पडले सोमय्या यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेताच सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसविले घोषणाबाजी व धक्काबुक्की मुळे याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : बर्ड फ्लूच्या खबरदारीमुळे संजय गांधी बायोलॉजिकल पार्क तात्पुरते बंद करण्यात आले

SCROLL FOR NEXT