Kirit-Somaiya sakal media
महाराष्ट्र बातम्या

किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना; पोलिसांशी झटापट तरीही निर्धार पक्का

विनायक होगाडे

मुंबई: किरीट सोम्मया यांनी उद्या कोल्हापूरला जाऊन मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या नियोजित दौऱ्याआधीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहता कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यात येण्यापासून प्रतिबंध केला आहे. तशी नोटीस त्यांना पोलिसांकडून दुपारी देण्यात आली आहे. मात्र, मला आताच अडवलं जाऊ शकत नाही, मी कोल्हापूरला जाणारच! असा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसने ते कोल्हापूरला जाणार आहेत. मात्र, त्यांना सीएसटी स्थानकावरच पोलिसांकडून रोखून धरण्यात आलं होतं. पोलिसांकडून त्यांना सातत्याने रोखण्यात येत होतं. मात्र, ते एक्स्प्रेसमध्ये जाण्यावर ठाम असल्याने आता ते कोल्हापूरला महालक्ष्मी एक्स्प्रेसने निघाले आहेत.

या एकूण घडामोडींबाबत आरोप करताना त्यांनी म्हटलंय की, मी अजून कोल्हापूरात गेलोच नाहीये. तर मला माझ्या घरात घुसून तुम्ही नोटीस देऊच कशी शकता? ठाकरे-पवार एवढे घाबरले आहेत का? जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिलीय की, किरीट सोमय्यांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यापासून प्रतिबंध आहे. 100 हून अधिक पोलिस माझ्या घराबाहेर दुपारी बारा वाजल्यापासून आले आहेत. मुश्रिफांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी मी कोल्हापूरला दौरा करणार होतो. मात्र, पवार एवढे घाबरले आहेत की, त्यांनी माझ्या अटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, मी कोल्हापूर दौऱ्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलिसांची गुंडगिरी ही ठाकरे सरकारची दादागिरी आहे. पोलिसांनी आतून मला आदेश दाखवलाय की, कोल्हापूर कलेक्टरांनी हा आदेश दिलाय की, ते कोल्हापूरला येता कामा नयेत. याचसाठी गृहमंत्र्यांनी हा आदेश दिलाय की, कोल्हापूरला येऊ नयेत. कारण ते आले तर ते हा घोटाळा बाहेर काढतील आणि अनिल देशमुखांनंतर त्यांनाही चौकशीचा ससेमिरा लागून जेलमध्ये जावं लागणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

SCROLL FOR NEXT