महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya: अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याचा मुहुर्त ठरला; किरीट सोमय्या म्हणाले...

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परब यांच्यावर साधला निशाणा

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत पुन्हा एकदा माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. दापोलीतील वादग्रस्त रिसॉर्टच्या सीआरझेडमधील बांधकामप्रकरणी उद्या ( सोमवार 12 सप्टेंबर) 2 याचिकांवर सुनावण्या होणार आहेत. येत्या आठ दिवसांत वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याच्या संदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि ऑक्टोबर महिन्यात पाडले जाईल, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पुढे न्यायालयातील निकाल सकारात्मक आला तर फौजदारीची प्रक्रिया सुरू होईल असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात सोमय्यांनी एक ट्विट करत माहिती दिली. ट्विटमध्ये ते म्हणाले की,''अनिल परब साई रिसॉर्ट घोटाळाप्रकरणी उद्या सोमवारी 12 सप्टेंबरला 2 याचिकेवर सुनावणी, दापोली न्यायालयात भारत सरकारच्या अनिल परबवर पर्यावरण कायद्या खाली फौजदारी खटला दाखल करावा आणि महाराष्ट्र सरकारच्या खेड न्यायालयात बनावटी कागदपत्र दाखवून, फसवणुकीने बिन शेती करून घेतले म्हणून कारवाई" होणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले होते की, 'माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी रिसॉर्टवर कारवाई केली नाही. तसेच न्यायालयातही अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल याचिकेचाही जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला नाही. पण आमच्या पाठपुराव्यानंतर रिसॉर्ट पाडण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात निविदा प्रक्रिया केली करुन रिसॉर्ट पाडण्यात येईल, असेही सोमय्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

CM Devendra Fadnavis : सरकार दबावाने नव्हे, संविधानानुसार चालते; जीसीसीमध्ये पुणे देशात अव्वल ठरणार

विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT