किरीट सोमय्या 
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापुरात किरीट सोमय्या तोफ डागणार; मुश्रीफांवर साधणार निशाणा

अर्चना बनगे

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या (kirit somaiya) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराबाबत मुरगूड (Murgud) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आज ११ वाजता कोल्हापूरमध्ये (Kolhapur) दाखल होणार आहेत. यावेळी ते करवीर निवासिनी आंबाबाईचे दर्शन घेऊन मुरगूडला जाणार आहेत. मुश्रीफांवर आणखी काय आरोप करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

किरीट सोमय्या कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर जाणार होते. याच कारखान्याच्या व्यवहारांबाबत त्यांनी आरोप केलेले आहेत. मात्र त्यांनी कारखान्यावर जाण्याचा दौरा रद्द करून मुरगूड पोलिस ठाण्यापर्यंत ते जाऊन पुन्हा कोल्हापुरात येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्याना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार याकडे ही लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्याना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार याकडे ही लक्ष लागून राहिले आहे. किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतरही सोमय्या रेल्वेने कऱ्हाडपर्यंत आले होते. तिथे पोलिसांनी त्यांना अडवले. आणि ते मुंबईला गेले. मात्र त्यांनी पुन्हा कोल्हापूरला मंगळवारी (२८) येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. आणि आज ते सकाळी कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. नागरी कृती समितीने सोमय्या कोल्हापुरात येऊ नये असे आवाहन केले होते.

कोल्हापुरात कडक बंदोबस्त

किरीट सोमय्या मुरगूडचा जाणार यासाठी तेथील आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवू नका असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. कायदा हातात घेण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी केले असे आरोप

भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपनी असून या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आपल्याकडे आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर, मुश्रीफांनी सीआरएम सिस्टम या कंपनीकडून 2 कोटींचे तर मरुभूमी फायनान्स कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतलं असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT